रोजगार मराठी

स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त ग्राम प्रशासन विषयी १०१ प्रश्न आणि उत्तरे

Gram Prashasan in marathi

 

०१) ‘मुंबई ग्राम पंचायत अधिनियम’ …………  या वर्षी संमत करण्यात आला ?

पर्याय –

A)१९५७       

B) १९५८   

C)१९६०        

D) १९५९

Ans – B

 

०२) ग्रामशिक्षण समितीचा अध्यक्ष ……………. असतो ?  

पर्याय –

A) सरपंच

B) मुख्याध्यापक

C) ग्रामसेवक  

D) पोलीस पाटील

Ans – A

 

०३) लखीना पॅटर्न ……………… या घटकाशी संबंधित आहे ?

पर्याय –

A) शैक्षणिक

B) आर्थिक

C)  प्रशासकीय  

D) वैद्यकीय

Ans – C

 

०४) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम या रोजी मंजूर झाला ?

पर्याय –

A) १६ ऑगष्ट १९६१

B) १० जानेवारी १९६२ 

C)  ०८ सप्टेंबर १९६३  

D) ०८ सप्टेंबर १९६१

Ans – D

 

०५) महाराष्ट्रात पंचायत राजची त्रिस्तरीय रचना ……….. या दिवशी लागू झाली ?

पर्याय –

A) १० मे १९६२

B) १ मे १९६२

C) ०८ सप्टेंबर १९६१  

D) ०१ मे १९७५

Ans – B

 

०६) केंद्रीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ‘जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा’ …………….. या वर्षी सुरू झाली ?

पर्याय –

A) १९८२

B) १९८५ 

C) १९८०  

D) १९७८

Ans – A

 

०७) महाराष्ट्रात नवे पंचायतराज ………………. पासून अस्तित्वात आले ?

पर्याय –

A) २३ एप्रिल १९८०

B) ०१ मे १९६०

C)  २३ एप्रिल १९९४   

D) ०१ मे १९९४

Ans – C

 

०८) मिडाचे नामकरण ‘यशवंतराव चव्हाण विकास प्रशासनप्रबोधिनी’ (यशदा) असे …………… या वर्षी झाले ?

पर्याय –

A) १९९१

B) १९८०

C) १९९५  

D) १९९०

Ans – D

 

०९) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून ………………… यांचा उल्लेख केला जातो ?

पर्याय –

A) लॉर्ड रिपन

B) अशोक मेहता

C) बलवंतराय मेहता   

D) हॉबहाऊस रॉयल विकेंद्रीकरण आयोग

Ans – A

 

१०) १९०६ साली स्थानिक संस्थांसाठी ……………….. या आयोगाची नेमणूक झाली ?

पर्याय –

A) हॉबहाऊस रॉयल विकेंद्रीकरण आयोग

B) लॉर्ड रिपन   

C) अशोक मेहता

D) बलवंतराय मेहता        

Ans – A

 

११) पंचायतराज संस्थांच्या कार्याच्या मूल्यमापनासाठी १९७७ मध्ये …………. ही समिती नेमण्यात आली ?

पर्याय –

A) अशोक मेहता

B) लॉर्ड रिपन

C)  हॉबहाऊस रॉयल   

D) बलवंतराय मेहता

Ans – A

 

१२) जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा, अशी शिफारस …………….. या समितीने केली ?

पर्याय –

A) हॉबहाऊस रॉयल

B) लॉर्ड रिपन   

C) अशोक मेहता 

D) बलवंतराय मेहता

Ans – D

 

१३) ………………… या समितीने आमदार व खासदारांना जिल्हा परिषदेचे सदस्यत्व असू नये असे सुचविले ?

पर्याय –

A) बलवंतराय मेहता

B) अशोक मेहता

C) लॉर्ड रिपन   

D) वसंतराव नाईक समिती

Ans – D

 

१४) जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसावा ही शिफारस ……………….. या समितीने केली ?

पर्याय –

A) बलवंतराय मेहता

B) लॉर्ड रिपन   

C) वसंतराव नाईक

D) अशोक मेहता

Ans – C

 

१५) वसंतराव नाईक समितीने …………… या घटकास सर्वाधिक महत्त्व दिले ?

पर्याय –

A) जिल्हा परिषद

B) ग्रामपंचायत

C) पंचायत समिती    

D) विधानसभा

Ans – A

 

१६) १९७० साली पंचायत राजचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेली समिती ………………….. हि होती ?

पर्याय –

A) ल.ना. बोंगीरवार

B) वसंतराव नाईक

C)  लॉर्ड रिपन   

D) बलवंतराय मेहता

Ans – A

 

१७) जिल्हा नियोजनाची संपूर्ण जबाबदारी पूर्णवेळ नियोजन अधिकाऱ्यांवर सोपवावी, अशी शिफारस …………….. या समितीने केली ?

पर्याय –

A) वसंतराव नाईक

B) बाबूराव काळे 

C) पी. बी. पाटील

D) ल.ना. बोंगीरवार      

Ans – C

 

१८) १९८० मध्ये पंचायतराज संस्थांच्या मूल्यमापना साठी ……………….. हि समिती नेमली ?

पर्याय –

A) लॉर्ड रिपन

B) वसंतराव नाईक

C)  ल.ना. बोंगीरवार    

D) बाबूराव काळे समिती

Ans – D

 

१९) बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या ……….. या वर्षी करण्यात आली ?

पर्याय –

A) १९५८   

B) १९५०   

C) १९५६  

D) १९५७

Ans – D

 

२०) वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल ……….. या रोजी सादर केला ?

पर्याय –

A) १५ मार्च १९६१

B) ०१ एप्रिल १९६०

C) १५ मार्च १९६०         

D) ०१ एप्रिल १९६१

Ans – A

 

कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवीन रचनापद्धती

२१) १९५८ ग्रामपंचायत कायद्याची अंमलबजावणी …………… पासून सुरू झाली ?

पर्याय –

A) ०१ मे १९५६

B) ०१ मे १९५९

C) ०१ जून १९५६

D) १ जून १९५९

Ans – D

 

२२) ग्रामपंचायत कायद्यातील ………………… या कलमान्वये प्रत्येक खेड्यासाठी ग्रामपंचायतीची तरतूद आहे ?

पर्याय –

A) तिसऱ्या

B) पाचव्या

C) चौथ्या

D) सहाव्या

Ans – B

 

२३) पंचायतराज संस्थांच्या कार्याच्या मूल्यमापनासाठी अशोक मेहता समिती ………….. या वर्षी नेमण्यात आली ?

पर्याय –

A) १९७७

B) १९७५ 

C)  १९६६  

D) १९८८

Ans – A

 

२४) ……………… या समितीने ग्रामसभा कार्यक्षम होण्यासाठी शिफारशी सुचविल्या ?

पर्याय –

A) ल. ना. बोंगीरवार

B) वसंतराव नाईक

C)  लॉर्ड रिपन   

D) बाबूराव काळे समिती

Ans – A

 

 २५) ग्रामसभेस १९९४ पासून वैधानिक दर्जा घटनात्मक आहे, त्याचे कारण …………….. आहे ?

पर्याय –

A) ६९ वी घटनादुरुस्ती

B) ७१ वी घटनादुरुस्ती     

C) ७५ वी घटनादुरुस्ती      

D) ७३ वी घटनादुरुस्ती

Ans – D

 

२६) ग्रामपंचायतीचा कारभार कार्यक्षमतेने चालावा यासाठी ………………. समिती नेमली ?

पर्याय –

A) संथानम

B) सादिक अली समिती        

C) बाबूराव काळे समिती            

D) वसंतराव नाईक            

Ans – B

 

२७) ……………….. या समितीने ग्रामपंचायतींना किमान दरडोई १ रुपया अनुदान द्यावे अशी शिफारस १९६३ मध्ये केली ?

पर्याय –

A) बाबूराव काळे समिती

B) लॉर्ड रिपन   

C) संथानम      

D) वसंतराव नाईक             

Ans – C

 

२८) गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन ……………… कडे आहे ?

पर्याय –

A) ग्रामसभा

B) ग्रामपंचायत

C) ग्राम पाणी पुरवठा समिती 

D) ग्रामसेवक

Ans – A

 

२९) १९९९-०० हे वर्षे केंद्र सरकारने ……………….. म्हणून जाहीर केले होते ?

पर्याय –

A) पंचायत राज वर्ष

B) सर्व शिक्षा वर्ष

C)  ग्रामपंचायत वर्ष   

D) ग्रामसभा वर्ष

Ans – D

३०) ग्रामपंचायतींना आर्थिक स्वायत्तता मिळावी यासाठी ……………. समिती नेमली होती ?

पर्याय –

A) भूषण गगराणी समिती

B) बाबूराव काळे समिती    

C) वसंतराव नाईक            

D) संथानम

Ans – A

 

३१) जिल्हा परिषदांची स्थापना ……………… कायद्यान्वये झाली ?

पर्याय –

A) जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१

B) जिल्हा परिषद अधिनियम १९६१

C) पंचायत समिती अधिनियम १९६१

D) तालुका प्रशाषण अधिनियम १९६१

Ans – A

 

३२) सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणूक गणपूर्तीसाठी ……….. सदस्यसंख्या लागते ?

पर्याय –

A) २/३

B) १/२

C) १/४    

D)१/३

Ans – B

 

३३) सरपंच व उपसरपंच यांची निवड करण्यासाठी बैठक ……………… बोलवितो ?

पर्याय –

A) तहसीलदार (जिल्हाधिकारी)

B) ग्रामसेवक  

C)  जिल्हाधिकारी     

D) गट विकास अधिकारी

Ans – A

 

३४) ग्रामपंचायत निवडणुकीत …………… पद खुले आहे ?

पर्याय –

A) सरपंच

B) सदस्य      

C) महिला सरपंच     

D) उपसरपंच

Ans – D

 

३५) महाराष्ट्रातील नगरपंचायती ……………… आहेत ?

पर्याय –

A) ४

B) ५

C)  ६       

D) ७

Ans – A

 

३६) गैरवर्तणुकीवरून सरपंच व उपसरपंच यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार ………………. यांस आहे ?

पर्याय –

A) तहसीलदार

B) जिल्हाधिकारी

C) जि. परिषद स्थायी समिती

D) गट ग्रामसेवक

Ans – C

 

३७) ग्रामसेवकाची बदली, बढती, नेमणूक करण्याचे अधिकार ……………….. यांना आहेत ?

पर्याय –

A) सरपंच

B) तहसीलदार

C) जिल्हाधिकारी      

D) मुख्य कार्यकारी अधिकारी

Ans – D

 

३८) ग्रामनिधीची संपूर्ण जबाबदारी ……………… वर असते ?

पर्याय –

A) सरपंच

B) ग्रामपंचायत सदस्य

C)  ग्रामसेवक   

D) तलाठी

Ans – C

 

३९) ग्रामपंचायतीतील एकूण सदस्य संख्येच्या …………….. जागा इतर मागासवर्गीयांसाठी आहेत ?

पर्याय –

A) ३५ टक्के

B) 17 टक्के

C)  २७ टक्के         

D) २२ टक्के

Ans – C

 

४०) पंचायत समितीच्या सभासदांच्या पात्रतेसाठी किमान वयोमर्यादा ………….. आहे ?

पर्याय –

A) २१ वर्षे

B) १८ वर्षे     

C) २५ वर्षे      

D) ३५ वर्षे

Ans – A

 

४१) पंचायत समितीला ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास …………….. दिवसात मंजुरी द्यावी लागते ?

पर्याय –

A) दोन महिन्यांत

B) तीन दिवसात     

C)  एक आठवड्यात        

D) दोन आठवड्यात

Ans – A

 

४२) ग्रामपंचायतीची हिशेब तपासणी जिल्हा परिषदेमार्फत …………… वर्षांनी होते ?

पर्याय –

A) दरवर्षी

B) दर एक वर्षांनी    

C) दर दोन वर्षांनी    

D) दर तीन वर्षांनी

Ans – C

 

४३) पंचायत समितीच्या सभापती/उपसभापतीचा कालावधी …………… आहे ?

पर्याय –

A) पाच वर्षे

B) दोन वर्षे      

C)  अडीच वर्षे   

D) तीन वर्षे

Ans – C

 

४४) सरपंचावरील अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास सदस्यांना …………… महिने अविश्वास ठराव आणता येत नाही ?

पर्याय –

A) ०६ महिने

B) ०९ महिने   

C) १२         

D) १६ महिने

Ans – C

 

४५) पंचायत समिती बरखास्त करण्याचे अधिकार …………… यांस आहेत ?

पर्याय –

A) राज्यशासन

B) तहसीलदार

C)  जिल्हाधिकारी     

D) पंचायत समिती अध्यक्ष

Ans – A

 

४६) पंचायत समितीची पहिली बैठक ……………. बोलवितो ?

पर्याय –

A) तहसीलदार

B) गट विकास अधिकारी

C) प्रांताधिकारी (जिल्हाधिकारी)          

D) पंचायत समिती अध्यक्ष

Ans – C

 

४७) पंचायत समिती सभापती ……………… कडे राजीनामा देतो ?

पर्याय –

A) जिल्हाधिकारी

B) तहसीलदार

C) जिल्हा परिषद अध्यक्ष       

D) गट विकास अधिकारी 

Ans – C

 

४८) पं. समितीच्या सभापती/उपसभापती निवडीसंदर्भात वाद निर्माण झाल्यास ……………….. यांच्याकडे दाद मागतात ?

पर्याय –

A) तहसीलदार

B) जिल्हाधिकारी     

C)  गट विकास अधिकारी    

D) विभागीय आयुक्त

Ans – D

 

४९) पंचायत समितीमध्ये प्रौढ मतदानाद्वारे ……………. लोकसंख्ये मागे एका सभासदाची निवड केली जाते ?

पर्याय –

A) १७,५००

B) २०,०००

C) २५,०००     

D) २१,५००

Ans – A

 

५०) गट विकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण ……………… यांचे असते ?

पर्याय –

A) मुख्य कार्यकारी अधिकारी

B) तहसीलदार

C)    जिल्हाधिकारी    

D) पंचायत समिती

Ans – A

 

 

५१) महाराष्ट्रात …………. जिल्हा परिषदा आहेत ?

पर्याय –

A) ३३

B) ३४      

C) ३५         

D) ३६

Ans – A

 

५२) महाराष्ट्र जिल्हा परिषदेतील किमान व कमाल सभासद संख्या ………….. असते ?

पर्याय –

A) ५० ते ७०

B) ५५ ते ७५

C)  ५० ते ७५   

D) ६० ते ७५

Ans – C

 

५३) पंचायत समितीचा कार्यकाल कमी जास्त करण्याचा अधिकार ………….. यांस आहे ?

पर्याय –

A) तालुका प्रशासन

B) जिल्हाप्रशासन

C)  राज्यशासन       

D) केंद्रशासन

Ans – C

 

५४) जि. प. पदाधिकाऱ्यांची मुदत ………………… असते ?

पर्याय –

A) पाच वर्षे

B) तीन वर्षे          

C) अडीच वर्षे    

D) चार वर्षे

Ans – C

 

५५) जि. परिषद निवडणूक निकालाबाबत आक्षेप असल्यास …………. दिवसात न्यायालयाकडे अर्ज करावा लागतो ?

पर्याय –

A) ०७

B) ३०

C)  १५         

D) २२

Ans – C

 

५६) जि. प. अध्यक्षांविरुद्ध एकदा अविश्वास ठराव आणल्या नंतर तो परत ………………….. आणता येतो ?

पर्याय –

A) १ वर्षानंतर

B) ०६ महिन्यानंतर   

C) १.५ वर्षानंतर      

D) ०२ वर्षानंतर

Ans – A

 

५७) जि.प.सभासदाचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी ……………. बहुमत आवश्यक असते ?

पर्याय –

A) १/३

B) २/३

C) १/४    

D) २/४

Ans – B

 

५८) जिल्हा परिषदेत एकूण …………… समित्या असतात ?

पर्याय –

A) ०९

B) ०८

C)  १०   

D) ११

Ans – A

 

५९) जि. परिषद महिला अध्यक्षांवर अविश्वास ठराव संमत होण्यासाठी आवश्यक बहुमत ……………… असते ?

पर्याय –

A) १/२

B) १/४

C) २/३    

D) ३/४

Ans – D

 

६०) स्थायी समितीवर अनुसूचित जाती-जमातींच्या ………… प्रतिनिधींना प्रतिनिधित्व मिळते ?

पर्याय – 

A) ०२

B) ०१

C) ०३         

D) ०४

Ans – A

 

६१) जिल्हा परिषदांच्या एकूण महसुली जमेपैकी शासकीय अनुदानाचा वाटा …………… असतो ?

पर्याय –

A) सुमारे ९० टक्के

B) सुमारे ७० टक्के   

C)  सुमारे ८० टक्के   

D) सुमारे ६० टक्के 

Ans – C

 

६२) जिल्हा परिषद क्षेत्रातील महसूल उत्पन्नाच्या ………….. रक्कम अनुदान म्हणून जि.प.ला मिळते ?

पर्याय –

A) ५० %

B) ६० %      

C)  ७०%       

D) ८० %

Ans – C

 

६३) जिल्हा परिषद स्थायी समितीचा सचिव ………… असतो ?

पर्याय –

A) उपमुख्य कार्यकारी अधिकारी

B) तालुका अधिकारी

C) जिल्हाधिकारी         

D) कार्यकारी अधिकारी

Ans – A

 

६४) सरकार प्रत्येक जिल्हा परिषदेला जिल्ह्याच्या विकास कार्यासाठी …………. टक्के अनुदान देते ?

पर्याय –

A) ५० %

B) ८० %

C) ६० %

D) ७५%

Ans – D

 

६५) जि. प. निवडणुका ………….. जाहीर करते ?

पर्याय –

A) जिल्हाधिकारी

B) केंद्र शासन

C) गट विकास अधिकारी

D) राज्यशासन

Ans – D

 

६६) जि. प. अहवालाची तपासणी करण्यासाठी विधानसभा ……………. ही समिती नेमते ?

पर्याय –

A) ग्रामसभा समिती

B) जिल्हा परिषद समिती

C) पंचायत राज समिती (१९७३)    

D) राज्य परिषद समिती

Ans – C

 

६७) कोणती जिल्हा परिषद ही प्रभाग समित्या स्थापन करणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद …………….. आहे ?

पर्याय –

A) अहमदनगर

B) मुंबई  

C)  पुणे   

D) नाशिक

Ans – A

 

६८) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देणारे राज्य …………… आहे ?

पर्याय –

A) महाराष्ट्र

B) गुजरात     

C) बिहार       

D) मध्य प्रदेश

Ans – D

 

६९) जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील पंचायत समिती सभापती हे जिल्हा परिषदेचे …………… सभासद असतात ?

पर्याय –

A) तात्पुरते

B) दुय्यम

C) पदसिद्ध

D) सर्वमान्य

Ans – C

 

७०) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षास जास्तीत जास्त …………… वेळा अध्यक्षपद भूषविता येते ?

पर्याय –

A) दोन वेळा

B) एकदा

C)  तीन वेळा   

D) चार वेळा

Ans – A

 

७१) ……………. या जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद सदस्य निधीसाठी प्रत्येकी २ लाख रुपयांची तरतूद केली ?

पर्याय –

A) नाशिक

B) पुणे

C) मुंबई   

D) नागपूर

Ans – B

 

७२) पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीचे वय ………….. निश्चित करण्यात आले आहे ?

पर्याय –

A) ५८ वर्षे

B) ६२ वर्षे

C)  ६५ वर्षे     

D) ६० वर्षे

Ans – D

 

७३) फेरफार उतारा ………….. यांच्याशी संबंधित आहे ?

पर्याय –

A) ग्रामसेवक

B) तलाठी

C) सरपंच      

D) पोलीस पाटील 

Ans – B

 

७४) कोतवालाचे सेवानिवृत्ती वय …………… आहे ?

पर्याय –

A) ५८ वर्षे

B) ६० वर्षे

C) ६२ वर्षे 

D) ५६ वर्षे

Ans – A

 

७५) कोतवालाच्या कामाचा मासिक अहवाल तहसीलदारास ……………… पाठवितो ?

पर्याय –

A) सरपंच

B) ग्रामसेवक

C) तलाठी/पोलीस पाटील    

D) गट विकास अधिकारी

Ans – C

 

७६) प्रांत अधिकाऱ्याच्या अखत्यारीत ………….. क्षेत्र असते ?

पर्याय –

A) ग्राम पंचायत (३५ ते ४०)

B) तालुके (१५ ते २०)

C)  उपविभाग/प्रांत (४ ते ५ तालुके) 

D) जिल्हे (७ ते १०)

Ans – C

 

७७) कोतवालाची नेमणूक ………….. करतो ?

पर्याय –

A) तहसीलदार

B) सरपंच

C) जिल्हाधिकारी 

D) ग्राम सेवक

Ans – A

 

७८) जिल्हा नियोजन मंडळाचा पदसिद्ध सचिव, रोहयो प्रमुख या जबाबदाऱ्या …………… पार पाडतो ?

पर्याय –

A) जिल्हाधिकारी

B) जिल्हा परिषद अध्यक्ष

C) तहसीलदार  

D) जिल्हा परिषद उपाधक्ष

Ans – A

 

७९) उपविभाग कार्यकारी प्रमुख, उपविभाग दंडाधिकारी, उपविभाग निवडणूक प्रमुख ……………….. असतो ?

पर्याय –

A) तहसीलदार

B) जिल्हाधिकारी

C) प्रांत अधिकारी

D) खंड विकास अधिकारी

Ans – C

 

८०) नेमणुकीसाठी पोलीस पाटलाची किमान व कमाल वयोमर्यादा …………… असते ?

पर्याय –

A) ३० ते ४० वर्षे

B) १८ ते ३१ वर्षे

C) २५ ते ३५ वर्षे     

D) २१ ते ३५ वर्षे

Ans – A

 

८१) पोलीस पाटलाची नियुक्ती ………….. कायद्यान्वये केली जाते ?

पर्याय –

A) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७

B) महाराष्ट्र नगरपालिका कायदा, १९६५

Ans – A

 

८२) कोतवालास ………………… यांच्या नियंत्रणात राहून कार्य करावे लागते ?

पर्याय –

A) सरपंच

B) पोलीस पाटील व तलाठी

C) ग्रामसेवक    

D) उपसरपंच

Ans – B

 

८३) महाराष्ट्रात ………….. लोकसंख्येमागे एक पोलीस स्टेशन असते ?

पर्याय –

A) तीन लाख

B) चार लाख

C) पाच लाख   

D) २ लाख

Ans – D

 

८४) नवीन प्रशासकीय विभाग …………….. आहे ?

पर्याय –

A) नांदेड

B) परभणी

C) गोंदिया

D) गडचिरोली

Ans – A

 

८५) प्रांत अधिकारी पोलीस पाटलाची नियुक्ती प्रथमतः …………… वर्षांसाठी करतात ?

पर्याय –

A) अडीच वर्षे

B) ५ वर्षे

C) चार वर्षे

D) दोन वर्षे

Ans – B

 

८६) विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती ………… करतो ?

पर्याय –

A) ग्राम पंचायत

B) जिल्हा प्रशासन

C) तालुका प्रशासन        

D) राज्यशासन

Ans – D

 

८७) गावपातळीवरील गुन्ह्याची खबर पोलीस स्टेशनला ………… देतो ?

पर्याय –

A) सरपंच

B) कोतवाल     

C) पोलीस पाटील 

D) ग्रामसेवक

Ans – C

 

८८) कोतवालास शिक्षा करण्याचा अधिकार ………….. यांस आहे ?

पर्याय –

A) तहसीलदार

B) पोलीस पाटील     

C) सरपंच      

D) जिल्हाधिकारी

Ans – A

 

८९) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम (१९६७) …………….. साली अमलात आणण्यात आला ?

पर्याय –

A) जून १९६६

B) जुलै १९६८   

C) जून १९६८   

D) ऑगस्ट १९६८

Ans – C

 

९०) पोलीस पाटलास शिक्षा करण्याचे अधिकार ………….. यांस आहेत ?

पर्याय –

A) तहसीलदार

B) जिल्हाधिकारी

C) सरपंच      

D) उपजिल्हाधिकारी

Ans – D

 

९१) पोलीस पाटलाच्या रजामंजुरीचा अंतिम अधिकार …………….. यांस असतो ?

पर्याय –

A) सरपंच

B) तहसीलदार

C) पंचायत समिती अधक्ष्य       

D) जिल्हाधिकारी

Ans – D

 

९२). राज्यात ………… महानगरपालिका आहेत ?

पर्याय –

A) २३

B) २२

C) २४         

D) २५

Ans – A

 

९३) ………………. कायद्यान्वये नागरी पंचायतराजची निर्मिती

झाली ?

पर्याय –

A) महाराष्ट्र नगरपालिका कायदा, १९६५

B) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७

Ans – A

 

९४) नगरपालिकेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी …………….. असतो ?

पर्याय –

A) नगराधाक्ष्य

B) जिल्हाधिकारी 

C) मुख्याधिकारी 

D) तहसीलदार   

Ans – C

 

९५) नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव ………….. असतो ?

पर्याय –

A) नगराधाक्ष्य

B) तहसीलदार

C) जिल्हाधिकारी 

D) मुख्याधिकारी

Ans – D

 

९६) सर्वात जुनी व मोठी महानगरपालिका …………….. आहे ?

पर्याय –

A) पिंपरी चिंचवड

B) पुणे

C)   मुंबई       

D) ठाणे

Ans – C

 

९७) नागरी पंचायत राजचा सर्वोच्च व शक्तिशाली घटक …………….. होय ?

पर्याय –

A) महानगरपालिका

B) ग्रामपंचायत

C) पंचायत समिती    

D) नगरपालिका

Ans – A

 

९८) आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका ………….. होय ?

पर्याय –

A) मुंबई

B) पिंपरी-चिंचवड     

C) नाशिक     

D) पुणे

Ans – B

 

९९) महापौरपदाची मुदत …………. असते ?

पर्याय –

A) पाच वर्षे

B) तीन वर्षे

C) दोन वर्षे    

D) अडीच वर्षे

Ans – D

 

१००) महानगरपालिका निर्मितीचा अधिकार …………… यांस आहे?

पर्याय –

A) जिल्हाधिकारी

B) कलेक्टर कार्यालय

C) विभागीय आयुक्तालय       

D) जिल्हा प्रशासन

Ans – C

 

१०१) महाराष्ट्रात व भारतात …………. कटक मंडळे आहेत ?

पर्याय –

A) ७ व ६२

B) ५ व ७५

C)  ७ व ६५         

D) ९ व ३२

Ans – A

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top