रोजगार मराठी

Set सेट पेपर ०१ – २०१९ जून

Set सेट पेपर ०१ – २०१९ जून भाषा – मराठी

या प्रश्नपत्रिकेत ५० बहुनिवड प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नास ०२ गुण आहेत.

प्रश्न क्रमांक 1.

विमर्शी स्तरावरील अध्यापन :

A) शिक्षककेंद्री आणि विषयकेंद्री असते मात्र अध्ययनकेंद्री नसते.

B) शिक्षककेंद्री नसते मात्र विषयकेंद्री आणि अध्ययनकेंद्री असते

C) शिक्षककेंद्री असते मात्र विषयकेंद्री आणि अध्ययनकेंद्री नसते

D) शिक्षककेंद्री नसते तसेच विषयकेंद्री नसते मात्र अध्ययनकेंद्री असते

उत्तर – A

 

प्रश्न क्रमांक 2.

प्रौढ अध्ययनार्थी  :

A) सहाध्यायी – प्रेरीत असतो.

B) स्वयंप्रेरित असतो

C) कुटुंब – प्रेरित असतो

D) समाजप्रेरीत असतो

उत्तर – B

 

प्रश्न क्रमांक 3.

मासिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस (MOOCs) म्हणजे …………………………. होय :

A) मोठ्या प्रमाणावरील (Mass) सहभागासाठी आरेखित केलेले, लवचिक आणि स्वनिर्देषित, मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन

B) मोठ्या प्रमाणावरील (Mass) सहभागासाठी आरेखित केलेले, लवचिक आणि शिक्षक–निर्देशित, मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन

C) मोठ्या प्रमाणावरील (Mass) सहभागासाठी आरेखित केलेले, लवचिक आणि स्वनिर्देषित, मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन

D) मोठ्या प्रमाणावरील (Mass) सहभागासाठी आरेखित केलेले, लवचिक आणि शिक्षक–निर्देशित, मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन

उत्तर – A

 

प्रश्न क्रमांक 4.

अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये ………………………… चा समावेश होतो.

A) स्मार्ट बोर्ड्स

B) ग्रीन बोर्ड्स

C) तक्ते

D) नकाशे

उत्तर – A

 

प्रश्न क्रमांक 5.

 अंतर्गत मुल्यमापनाला, खालीलपैकी काय लागू पडत नाही  ?

A) अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकात्मीकरण

B) कौशल्ये आणि क्षमता यांची तपासणी

C) समयकालिक (periodic) आणि निरंतर (continuous)

D) केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग

उत्तर – D

 

प्रश्न क्रमांक 6.

सत्यशोधनासाठीची संवाद पद्धती ………………… यांनी दिली.

A) प्लेटो

B) सोक्रेटीस

C) फ्रोबेल

D) हरबार्ट

उत्तर – B

 

प्रश्न क्रमांक 7.

जर एक चल नामांकन श्रेणीवर (Nominal Scale) मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतरश्रेणी (Interval Scale) मोजले जात असेल, तर योग्य संशोधन पद्धती …………………. ही असेल.

A) प्रायोगिक पद्धती

B) व्यक्ती-अभ्यास पद्धती

C) तिर्यक-छेदात्मक पद्धती

D) सहसंबंध पद्धती

उत्तर – A

 

प्रश्न क्रमांक 8.

खालीलपैकी कोणते चांगल्या परीकल्पनेचे (hypothesis) वैशिष्ट्य नाही ?

A) तपासणी क्षमता

B) वस्तुनिष्ठता

C) गुंतागुंत

D) संबोधस्पष्टता

उत्तर – C

 

प्रश्न क्रमांक 9.

जर वारंवारिता वितरणाचे माध्यमान आणि मध्यांक अनुक्रमे २० व २२ असतील, तर त्या वितरणाचे बहुलक …………………………. असेल

A) 21

B) 16

C) 26

D) 11

उत्तर – C

  

प्रश्न क्रमांक 10.

दुसऱ्याच्या संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे, यास …………………. म्हणतात.

A) कॉपीराईट

B) वांड.मयचौर्य

C) प्रकाशन

D) स्वामित्व हक्क

उत्तर – B

 

सूचना :

प्रश्न क्रमांक ११ ते १५ हे पुढे दिलेल्या उताऱ्यावर आधारित आहेत. इंग्रजीतील किंवा मराठीतील न्तार्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या :

भारतीय माणसाची एक विशिष्ट मनोवृत्ती आहे. गेल्या पाच हजार वर्षाच्या परंपरेतून ती सिद्ध झालेली आहे. कोणत्याही एका पंथाबद्दल, विचाराबद्दल, आचरनाबद्दल भारतीय माणूस टोकाचा आग्रही नसतो. एका शब्दात सांगायचे तर भारतीय माणूस अनाग्रही आहे. ‘अनाग्रही’ असणे चांगले कि वाईट, हा खरा प्रश्न नाही. खरा प्रश्न आधी येथील समाजाचे हे स्वरूप नित समजून घेण्याचा आहे. म्हणूनच या समाजाला एकात्म करताना येथील विचारवंतांनी ‘विविधतेत एकता’ अशी घोषणा दिली. यात प्रत्येक समाजाची स्वायतत्ता टिकून राहते, प्रत्येक समाजाची अहंता सुखावते आणि क्च्पण एक असल्याची जाणीव हळूहळू रुजवता येते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर भारत हे कधीच एक राष्ट्र नव्हते. इथे जातीजातींचे स्वायत्त गट होते. या सायात्ता गटांनी धर्म-पंथांचे वस्त्र चढवून पुन्हा आपले वेगळेपण टिकवले होते. भाषेच्या सिमा रेषांनी पुन्हा आपापले वेगळेपण राखले होते. अश्या आपली समाजाने गेल्या दीडशे वर्षात एक नावे वळण घेतले आहे. जीतीची स्वायत्तता प्रादेशिक स्वायत्ततेत विलीन करण्यास आज आपला समाज मानसिकदृष्ट्या तयार झाला आहे. हि प्रादेशिक स्वायत्तता कायम ठेवून राष्ट्रीय एक्य निर्माण व्हावे, या ध्येयवादास इथल्या समाजाने मान्यता दिलेली आहे. आणि हा सर्व गेल्या शे-दीडशे वर्षांतल्या अनेक चळवळीनच्या एक अंतिम परिणाम आहे. एका फार मोठ्या संक्रमांतून भारतीय समाजाची वाटचाल चालू आबे. अशा या वाटचालीचा अभ्यास करण्याचे अत्यंत महत्वाचे साधन वाड.मय असते. वाड.मय ही मनुष्यनिर्मित कला आहे. अत्यंत परिचित आणि सहज उपलब्ध असलेल्या भाषेच्या साधनातून ती प्रकट होते. भाषेत मृत संस्कृतीचे जसे अनेक अवशेष असतात, तसे समाजाच्या बदलात्ये स्तिथी-गतीचेही तरंग असतात. म्हणून वाड.मय ही कला जशी संस्कृतीची फलश्रुती आहे तशीच संस्कृतीच्या अभ्यासाचेही ते फार मोठे साधन आहे. वाड.मयाचा व्यवहार ते ज्या संस्कृतीत निर्माण होते, त्या संस्कृतीच्या आकलनाशिवाय कळणेच शक्य नाही.

             

प्रश्न क्रमांक 11.

भारतीय माणूस अनाग्रही आहे, कारण :

A) त्याची सर्वसमावेशकता

B) त्याची भावनात्मकता

C) त्याची संघटनशीलता

D) त्याचा बुद्धीप्रामाण्यावाद

उत्तर – A

 

प्रश्न क्रमांक 12.

भारतीय समाजव्यवस्था ही वैशिष्ट्य पूर्ण आहे ; तशी ती अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला त्याचे वैचारिक स्वातंत्र्य देणारीही आहे :

A) संपूर्ण विधान बरोबर

B) संपूर्ण विधान चूक

C) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

D) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

उत्तर – A

 

प्रश्न क्रमांक 13.

भारत हे कधीच एक राष्ट्र नव्हते ; कारण :

A) धर्मपंथांचा आंधळेपणा

B) सामाजिक अहंकार

C) जातीजातीतील स्वायत्तता

D) भाषिक समानता

उत्तर – C

 

प्रश्न क्रमांक 14.

जातीय स्वायत्तता आणि प्रादेशिक स्वायत्तता या दोन बाबी स्वंतंत्र असून ; त्या दोन्ही एकत्र आल्यास राष्ट्रीय ऐक्याची भावना वाढीस लागेल.

A) संपूर्ण विधान चूक

B) संपूर्ण विधान बरोबर

C) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

D) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

उत्तर – B

 

प्रश्न क्रमांक 15.

वाड.मयाच्या अभिव्यक्तीचे माध्यम कोणते ?

A) समाज

B) मनुष्य

C) संस्कृती

D) भाषा

उत्तर – D

 

प्रश्न क्रमांक 16.

डॉक्टर देवल यांच्या मते, संप्रेषण म्हणजे :

A) कल्पनांचे सामायिकीकरण

B) अनुभवांचे सामायिकीकरण

C) अवबोधन

D) भावनांचे सामायिकीकरण

उत्तर – C

 

प्रश्न क्रमांक 17.

वर्गात पाठ शिकविण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने पाठाची उद्दिष्ट्ये, विद्यार्थ्याचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या मध्यमाविषयीचे ज्ञान व ………………….. लक्षात घेतले पाहिजे.

A) अध्यापनपद्धती

B) शैक्षणिक साधने

C) समूह माध्यम

D) मूल्यमापन व्यवस्था

उत्तर – D

 

प्रश्न क्रमांक 18.

ट्राफिक सिग्नल्स हे …………………………. संप्रेषनाचे उदाहरण होय.

A) समूह

B) अशाब्दिक

C) शाब्दिक

D) एकाकडून अनेक

उत्तर – B

 

प्रश्न क्रमांक 19.

एखाद्या मॉलमध्य गिऱ्हाइके येतात ते आपल्या सामायिक हिताच्या बाबींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्ये समूहाच्या कृती स्थिरपणे वृद्धिंगत होत जातात. हे ………………………… समूहाचे उदाहरण होय.

A) मुक्त

B) बद्ध

C) सहकारी-सहकारी

D) श्रेणीबद्ध

उत्तर – A

 

प्रश्न क्रमांक 20.

काहीवेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात कारण येथे ग्राहक ………………………. असतात.

A) बहुजिनसी (heterogenous)

B) असंख्य

C) निरक्षर

D) चिकित्सक

उत्तर – A

 

Free Jobs Notification – Click Here

 

प्रश्न क्रमांक 21.

एका खेळामध्य X Y हे दोन खेळाडू आहेत व एका कागदावर  n(>4) वर्तुळे रेखाली आहेत; X आणि Y हे एकानंतर एकाने अगोदर न जोडलेल्या दोन वर्तुळाना रेषाखंडाने जोडतात. जो शेवटची वर्तुळजोडी जोडतो तो जिंकतो व खेळ संपतो. जर X ने खेळाची सुरुवात केली, तर :

A) X नेहमी जिंकणार

B) Y नेहमी जिंकणार

C) n विषम असेल तर X जिंकणार

D) n ही संख्या दोनाच्या घातांक स्वरुपात असेल तर Y जिंकणार

उत्तर – D

 

प्रश्न क्रमांक 22.

एका वर्गातील रांगेत असलेल्या दहा खुर्च्या c1, c2, c3, ……………….c10 ना 1, 2, 3,……………., 10 या संख्यांनी नामांकित केलेलं आहे क्रमशः  k1, k2, k3, …………, k10 हे नामांकन c1, c2, c3, ……….., c10 खुर्च्यांनी दिलेले आहे ते ki < kj  जेव्हा i < j हि आत पाळतात तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

A) काही i साठी, ki = i

B) दोन ij साठी ki = i kj = j

C) सर्व नामांकने वेगवेगळे आहे

D) प्रत्येक i साठी, ki = i

उत्तर – A

 

प्रश्न क्रमांक 23.

एका टोपलीत असलेली सर्व फुले रांगेत उभ्या असलेल्या पाच व्यक्तींना पुढील प्रमाणे वाटली. दुसऱ्या व्यक्तीस पहिल्या व्यक्तीच्या निम्मी फुले, तिसऱ्या व्यक्तीस दुसऱ्यापेक्षा निम्मी फुले, चौथ्या व्यक्तीस तिसऱ्यापेक्षा निम्मी फुले व पाचव्या व्यक्तीस चौथ्या व्यक्तीपेक्षा निम्मी फुले दिली. जर पाचव्या व्यक्तीस एक फुल मिळाले, तर टोपलीत एकूण फुले किती ?

A) 31

B) 32

C) 16

D) 15

उत्तर – A

 

प्रश्न क्रमांक 24.

एक काम ६ पुरुष किंवा ८ मुले २४ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम ७ पुरुष आणि १२ मुले मिळून किती दिवसांत पूर्ण करतील ?

A) 12

B) 9

C) 10

D) 16

उत्तर – B

 

प्रश्न क्रमांक 25.

एका समांतरभूज चौकोनाचे क्षेत्रफळ 128 cm2  आहे व त्याची उंची संबधित पायापेक्षा दुप्पट आहे, तर त्या पायाची लांबी किती ?

A) 6 cm

B) 7 cm

C) 12 cm

D) 8 cm

उत्तर – D

 

प्रश्न क्रमांक 26.

खाली दिलेल्या संकल्पना अर्थपूर्ण व तार्किक पद्धतीने मांडून योग्य क्रम कोणता ते शोधा :

1) गवत

2) दही

3) दुध

4) गाय

5) लोणी

A) 1-4-3-2-5

B) 4-3-2-1-5

C) 5-2-3-4-1

D) 4-1-3-2-5

उत्तर – D

 

प्रश्न क्रमांक 27.

जर HJLN याचे रुपांतर ILOR, असे होत असेल, तर त्याच तत्वाने DFHJ यासाठी कोणता पर्याय बरोबर असेल ?                                                                                                                                                                                                                                  

A) FHJN

B) EHKN

C) EGIL

D) FHJN

उत्तर – B

 

प्रश्न क्रमांक 28.

पोपटांचा रंग हिरवा आहे .’ हे विधान ……………….. प्रमाणाचे आहे.

A) प्रत्यक्ष

B) अनुमान

C) उपमान

D) अर्थापती

उत्तर – A

 

प्रश्न क्रमांक 29.

खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहेत ?

विधान I :

सर्व गाढव कष्टाळू आहेत.

विधान II

काही कष्टाळू प्राणी मानव आहेत.

निष्कर्ष 1 :

काही गाढव कष्टाळू आहेत.

निष्कर्ष 2 :

काही गाढव मानव आहेत.

A) 1 फक्त

B) 2 फक्त

C) 1 आणि 2 दोन्ही

D) 1 नाही 2 पण नाही

उत्तर – B

 

प्रश्न क्रमांक 30.

खालीलपैकी कोणती आकृती तीन संकल्पनांमधील संबध बरोबर दर्शविते ?

मुलं, विद्यार्थी, मुली

A)

B)

C)

D)

उत्तर – A

 

प्रश्न क्रमांक 31.

एका परीक्षेबाबतचा अहवाल पुढे दिलेला आहे :

परीक्षेसाठी बसलेले एकूण उमेदवार = 1000

पुरुष उमेदवार = 550

पास झालेले उमेदवार = 700

पास झालेल्या पुरुषांची संख्या …………….. या मर्यादेमध्य असेल.

 

A) 100 ते 250

B) 250 ते 550

C) 550 ते 700

D) 700 ते 1000

उत्तर – B

 

Direction :

प्रश्न क्रमांक 32 आणि 33 हे पुढील माहितीवर आधारित आहेत :

राज्य स्त्री व पुरुष एकूण नोकर्दारंची संख्या पुरुष नोकरदारांचे स्त्री नोकर्दारांशी गुणोत्तर एकूण नोकरदारांपैकी पदव्युत्तर नोकरदारांची शेकडेवारी
A 20,000 13 : 7 60
B 30,000 8 : 7 50
C 25,000 5 : 5 64
D 40,000 14 : 6 72
E 10,000 6: 4 42

प्रश्न क्रमांक  32.

D या राज्यातील पुरुष नोकरदारांची संख्या काढा :

A) 14,000

B) 6,000

C) 28,000

D) 20,000

उत्तर – C

 

प्रश्न क्रमांक 33.

पदव्युत्तर स्त्री नोकरदारांची B राज्यामधील संख्या काढा :

A) 8,000

B) 15,000

C) 350

D) 7,000

उत्तर – D

 

सूचना :

प्रश्न क्रमांक 34 आणि 35 हे पुढील वर्तुळ-आकृतीवर आधारित आहेत :

 

A : छपाई खर्च

B : कागदाचा खर्च

C : मानधन  

D: जाहिरात खर्च

E : अन्य खर्च

प्रश्न क्रमांक 34.

जर कागदाचा खर्च 16,000 रु. असेल, तर अन्य खर्चाची रक्कम काढा :

A) 16,000 रु.

B) 10,000 रु.

C) 8,000 रु.

D) 12,000 रु.

उत्तर – C

 

प्रश्न क्रमांक 35.

मानधनाच्या रकमेवर 10% दराने कर कापल्यास कराची रक्कम ………………….. आहे.

A) रु. 1,200

B) 800 रु.

C) 1,000 रु.

D) 8,000 रु.

उत्तर – A

 

प्रश्न क्रमांक 36.

IPTV या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता ?

A) इंटरनैशनल AND पोलिटिकल टेलिव्हिजन

B) इंटरनेट प्रोलीफरेशन टेलीव्हिजन

C) इंटर प्रोव्हिजनल टेलिव्हिजन

D) इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन

उत्तर – D

 

प्रश्न क्रमांक 37.

जगातील पहिला संगणक (एनियाक) या वर्षी विकसित करण्यात आला :

A) 1945

B) 1940

C) 1955

D) 1960

उत्तर – A

 

प्रश्न क्रमांक 38.

भारतात पुढीलपैकी कोणती संवाद सेवा ?

A) टपाल सेवा

B) दूरध्वनी (LANDLINE)

C) तार

D) FAX

उत्तर – C

 

प्रश्न क्रमांक 39.

महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छीनाऱ्यानी स्वतःची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे ?

A) सरल

B) महा जॉब्स

C) ई-सेवा

D) पवित्र

उत्तर – D

 

प्रश्न क्रमांक 40.

भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालयासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही  ?

A) हा केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे.

B) एक खिडकी शोध सुविधा असलेला हा शैक्षणिक संदर्भसाहित्याचा आभासी साठा आहे.

C) हे ग्रंथालय दिव्यांग अभ्यासकांना सहजपणे वापरता येते.

D) या ग्रंथालयाचा विकास भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी.), खरगपूर येथे करण्यात येत आहे.

उत्तर – A

 

प्रश्न क्रमांक 41.

ओझोन कमी करणाच्या पदार्थाविषयीची परिषद ………………………………… म्हणूनही ओळखली जाते.

A) बेसेल परिषद

B) Montreal Protocol

C) रामसर परिषद

D) विविध देशांच्या गटाची परिषद

उत्तर – B

 

प्रश्न क्रमांक 42.

ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक वापरले जाते ?

A) Joule

B) PPM

C) Bit

D) dB

उत्तर – D

 

प्रश्न क्रमांक 43.

हरित भारत मोहीम हा ……………………. चा भाग आहे.

A) सहस्त्रक विकास उद्दिष्टे

B) नद्या विकास योजना

C) स्वच्छ भारत अभियान

D) वातावरणीय बदलासाठीचा राष्ट्रीय कृती योजना

उत्तर – D

 

प्रश्न क्रमांक 44.

आंतरराष्ट्रीय सौर सह्भागीत्व जे सौर उर्जा सहकार्य विकसनासाठी कोणी प्रस्तावित केले होते ?

A) भारतीय प्रधानमंत्री

B) फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष

C) आफ्रिकन युनियन

D) ईरोपियन युनियन

उत्तर – A

 

प्रश्न क्रमांक 45.

अन्नसाखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने ……………….. याला कारणीभूत होतात.

A) संचय

B) उत्सर्जन

C) जैव विस्तारीकरण

D) काढून टाकणे

उत्तर –C

 

प्रश्न क्रमांक 46.

तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण हे ………………………. प्रणालीमध्ये दिले जात होते.

 

A) वैदिक शिक्षण

B) पूर्व-वैदिक शिक्षण

C) बुद्धिस्ट शिक्षण

D) इस्लामिक शिक्षण

उत्तर – C

 

प्रश्न क्रमांक 47.

यु. जी. सी. ने प्रसिद्ध केलेल्या यादिनुरार ………………………. या राज्यात सर्वात जास्त विद्यापीठे आहेत.

A) उत्तरप्रदेश

B) महाराष्ट्र

C) तमिळनाडू

D) राजस्थान

उत्तर – D

 

प्रश्न क्रमांक 48.

विविध विद्याशाखेतील MOOC कोर्सेस विकसित करण्यासाठी MHRD ने आठ राष्ट्रीय कोऑर्डीनेटर्स पैकी…..………………… हि एक संस्था.

A) मुम्बई विद्यापीठ

B) विद्यापीठ अनुदान आयोग

C) य.च. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

D) आय.आय.टी. मुंबई

उत्तर – B

 

प्रश्न क्रमांक 49.

बहुतांश राज्य विद्यापीठे ही …………………….. स्वरूपाची विद्यापीठे आहेत.

A) संलग्नित

B) अभिमत

C) स्वयं-अर्थ सहाय्यित

D) खाजगी

उत्तर – A

 

प्रश्न क्रमांक 50.

प्राचार्यांसाठी प्रकाशकीय कोर्स कोणते अस्थापना आयोजित करते  ?

A) मानव संसाधन मंत्रालय

B) विद्यापीठ अनुदान आयोग

C) राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ

D) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद

उत्तर – C

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top