रोजगार मराठी

कामगार व कुटुंबातील सदस्यांकरिता गंभीर आजार उपचार सहाय्यता योजना – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ Maharashtra Labour Welfare Board

विभागाचे नाव –

Maharashtra Labour Welfare Board

महाराष्ट्र शासन – कामगार विभाग, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ

योजनेचे नाव –  गंभीर आजार उपचार सहाय्यता योजना

मदतीचे स्वरूप – औषधोपचार खर्चानुसार ५ ते २५ हजार पर्यंत आर्थिक मदत.
🌼
या योजनेचा लाभ कोण घेवू शकतो –

ज्यांच्या माहे जुन व डिसेंबरच्या पगारातून ₹१२/- इतका कामगार कल्याण निधी कपात होतो. त्या कामगार व कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

या योजनेंतर्गत कोण कोण येतात – म्हणजे योजन कोणासाठी ?
साखर कारखाने, सुतगिरणी, लहाण मोठे कारखाने, सर्व बँका, इन्शुरन्सची कंपनी, शाॅपिंग माॅल्स, वाहतूक कंपन्या, एस.टी. महामंडळ, वीज कंपनी, वीज वितरण कंपनी, बी.एस.एन.एल., एम.टी.एन.एल. दुध संघ, कापूस पणन महासंघ, गव्हर्नमेंट प्रेस, सर्व दवाखाने, कृषि उद्योग महामंडळ, सर्व वृत्तपत्रे, कुरिअर सर्विसेस, प्राथमिक शिक्षक बँक, किंवा फॅक्ट्रि अँक्ट अंतर्गत येणार्या सर्व आस्थापना, बाँम्बे शाॅप अँक्ट अंतर्गत सर्व दुकाने, द मोटर ट्रान्सपोर्ट अँक्ट अंतर्गत नोंदित आस्थापना मध्ये काम करणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हि योजना दरवर्षी चालवते.

गंभीर आजार वैद्यकिय उपचार सहाय्यता योजना.

शासनाने ठरवुन दिलेले खालील फक्त गंभीर अजारांसाठी योजनेचा लाभ मिळतो.👇🏼

  • ब्रेन ट्युमर
  • हदय शस्त्रक्रिया
  • क्षययरोग
  • एड्स
  • मुत्रपिंड प्रत्यारोपन
  • कर्करोग
  • कोमा
  • गँगरिन
  • गंभीर स्वरूपाचे पॅरलिसिस
  • गंभीर स्वरूपाचे सिकलसेल 
  • इतर गंभीर स्वरूपाचे आजार ज्यास मंडळाने चिकित्सकाच्या (डाॅक्टरांच्या) सल्ल्याने गंभीर आजार म्हणून मान्यता दिलेली असावी

अर्ज कसा करावा

▪योजनेचा अर्ज मंडळाच्या पोर्टलवर Online पध्दतीने भरावा लागेल.
▪️अर्ज करण्यापूर्वी online द्वारे कामगाराची व रुग्णाची सभासद नोंदणी करावी लागेल. (Membership)
▪️कामगाराचे कुटुंबियात आई वडिल, पत्नी व मुले गृहित धरले जातील.
▪️गंभीर आजाराचा उपचार हा मान्यताप्राप्त रुग्णालयातच झालेला असावा/ चालू असावा.
▪️गंभीर आजाराचा उपचाराच्या पावत्या या एक वर्षाच्या आतील असाव्यात.
▪️उपचार सुरु असेल तर वैद्यकिय उपचारावर होणाऱ्या खर्चाचा वैद्यकिय अधिकारी/ डाॅक्टरांचा दाखला सोबत जोडावा.
▪️योजनेसाठी मंडळात अर्ज जमा केल्यानंतर अर्ज विचाराधिन असताना रुग्ण मृत पावल्यास कामगारास अथवा कामगाराच्या वारसाला सर्व नियम अटींची पूर्तता करीत असल्यास मंजुर आर्थिक मदत अदा केली जाईल.
▪️एका आजारासाठी एका कामगार वा कुटुंबिय रुग्णास एकदाच लाभ देण्यात येईल. परंतु त्याच रुग्णास दुसरा नविन आजार झाला तर त्यास दुस-यांदा लाभ दिला जाईल.

 

आवश्यक कागदपत्रे

▪️रुग्णालयाचे आजाराबाबत कागदपत्रे, रोग निदान प्रमाणपत्र
▪️डिस्चार्ज कार्ड /समरी
▪️आजाराचे तपासणी रिपोर्टस्, आॅपरेशन रिपोर्टस् इ.
▪️सी.टी. स्कॅन, एम.आर आय, एंजीओग्राफी, बायपास आदी रिपोर्टस्
▪️दवाखााना, तपासण्याची व औषधे खरेदी पोच पावत्या.
▪️खर्च पावत्यांचा एकत्रीत तक्ता. त्यावर अनु, बील क्र, तपशिल (कशाचे बील आहे ते) दिनांक व रक्कम असे अनुक्रमे तपशिल लिहावेत.
▪️कामगाराचा फोटो
▪️रुग्णाचा फोटो
▪️कामगाराचे आधार कार्ड
▪️रुग्णाचे आधार कार्ड
▪️कामगाराची माहे जुन २०२२ ची पगारस्लिप
▪️रेशन कार्ड
▪️कामगाराचे बँक पासबुक

ONLINE PROCESS

  • आपल्या कंपनीतून कामगाराने स्वतःचा LIN number आणि कंपनीने नोंदविलेला mobile number मिळवावा.

मंडळाची वेबसाइट 👉🏼
www.public.mlwb.in

  • वरील वेबसाइट उघडून त्यातील Labour login मध्ये जाऊन आपल्या कुटुंबाची माहिती भरावी.
  • त्यांचे फोटो व आधार कार्ड अपलोड करुन घ्यावेत.
  • Membership मध्ये जाऊन New membership किंवा Renew membership करावे.
  • यात खालील प्रमाणे माहिती नोंदवावी

District – अमरावती
Division – अकोला
Circle – अमरावती
Center – का.क.के. गांधी चौक अमरावती
अशा नोंदी कराव्यात.

महत्वाची टीप –

सदर माहिती कामगार कल्याण केंद्र गांधीचौक अमरावती
श्री. सचिन खारोडे, केंद्र संचालक
कामगार कल्याण केंद्र गांधी चौक अमरावती
📞 9890101052 यांच्या परवानगीने येथे पुरवत असून आपण आपल्या जिल्ह्यानुसार माहिती भरू शकता

District –  तुमचा जिल्हा नोंदवावा
Division – डिविजन चे नाव टाकावे
Circle – सर्कल चे नाव टाकावे
Center – सेंटर चे नाव नोंदवावे
अशा नोंदी कराव्यात.

🔅पुढिल योजना मिळविण्यास आपले सर्व कुटुंबियांस member (सभासद) करावे.
🔅माहिती भरून स्वत: कामगार व त्या सर्वांचे online पैसे भरावेत.
▪️कामगार ₹१५/-
▪️कुटुंबिय ₹२०/-

  • प्रत्येकाचे आधार कार्ड व कामगाराची जुन २१ ची पेस्लिप अपलोड करावी.
  • membership केल्यानंतर का.क.केंद्र गांधी चौक अमरावती यांचेकडून त्याचे approval करुन घ्यावे.
  • अर्ज approve झालेचा मेसेज नोंदविलेल्या मोबाइल वर येईल. त्यानंतर. . .
  • Membership option मध्ये Application For Schemes याची निवड करुन गंभीर आजाराचा online अर्ज भरावा.

सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे

  • डिस्चार्ज कार्ड
  • आजाराचे फक्त महत्वाचे रिपोर्टस् ज्याद्वारे गंभीर आजार असल्याचे कळून येतो
  • तपासणी/ चेक अप रिपोर्ट
  • सर्व खर्चाची बिले / पावत्या 
  • या सर्वांना स्कॅन करुन याची एक पि.डीएफ फाईल तयार करावी.
  • २०० KB फाईल असावी. (ती कागदपत्रे वाचता यावीत)
  • महत्वाचेच रिपोर्ट /कागद जोडावेत
  • महत्वाचे सी.टी. स्कॅन, एन्जिओग्राफी, स्कॅन आदि फक्त महत्वाचे रिपोर्टची एक पि.डी.एफ फाइल तयार करावी.
  • खर्च पावत्यांचा एकत्रीत तक्ता. त्यावर अनु, बील क्र, तपशिल (कशाचे बील आहे ते) दिनांक व रक्कम असे अनुक्रमे तपशिल लिहिलेला याची एक PDF करावी.
  • वरील तीन PDF file अपलोड कराव्यात.
  • व अर्ज Submit करावा.
  • कामगाराच्या मोबाइल वर OTP येतो तो टाकावा.
  • तयार झालेल्या अर्जाची प्रिंट करुन घ्यावी. व खालिल क्रमांकावर संपर्क करावा.

पत्ता:
कामगार कल्याण केंद्र गांधीचौक अमरावती
सचिन खारोडे
केंद्र संचालक
कामगार कल्याण केंद्र गांधी चौक अमरावती
📞 9890101052

कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त निधी भरणाऱ्या कामगारांपर्यंत पोचवावी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top