रोजगार मराठी

पोलीस भरती २०२४ – १७,४४१ पदांची भरती लवकरच – शासन निर्णय जाहीर

पोलीस भरती २०२४

Other Latest Jobs

महाराष्ट्र शासन, गृह विभाग मार्फत दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी १७,४७१ पदांच्या भरतीबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे.

प्रस्तावनेमध्ये  सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दिनांक ३१-१२-२०२३ अखेर पर्यंत) राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलीस शिपाई, बैन्ड्समन,पोलीसशिपाईचालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ इतकी पदे भरतीकरिता उपलब्ध होणार आहे असे नमूद केलेले आहे.

याअगोदर वित्त विभागाच्या दिनांक ३०/०९/२०२२ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृत्बंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पडे वगळता, अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे.

पण या दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दिनांक ३१-१२-२०२३ अखेर पर्यंत) राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलीस शिपाई, बैन्ड्समन,पोलीसशिपाईचालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ पदे १०० टक्के भरण्यास वित्त विभागाच्या दिनांक ३०/०९/२०२२ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सुत देण्यात येत आहे. असे नमूद केलेले आहे.

शासन निर्णय बघा – क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top