सिमकार्ड गैरवापराचे धोके Dangers of sim card misuse
आजकाल आपण अनेक Online Fraud च्या केसेस ऐकत असतो. अनेक Fraud हे Mobile वर फोन करून, SMS करून किंवा Whats App वर MSG करून केल्या जातात. यात वापरले जाणारे SIM Card किंवा Mobile No. हे गुन्हेगाराचे स्वतःचे नसतात तर या अनेक गुन्हेगार टोळ्या दुसऱ्यांच्या ओळखपत्रांचा वापर करून SIM Car खरेदी करतात आणि आर्थिक फसवणूक करतात. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याला आळा घालण्यासाठी ग्राहकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. आणि जर यात आपल्याच नावाने SIM Car घेवून त्याचा वापर होत असेल तर आपल्यालाही कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागेल.
एकाच वेळी अनेक सिमकार्ड वापरण्याची काळजी
भारतात मोबाईल नेटवर्क कंपन्या विविध आकर्षक ऑफर्ससह सिमकार्ड विक्री करतात. यामुळे ग्राहक कमी किमतीत किंवा मोफत टॉकटाइमच्या लालसेने अनेक सिमकार्ड खरेदी करतात. अनेक वेळा बनावट ओळखपत्रांचा वापर करून सिमकार्ड सक्रिय केले जातात, ज्यामुळे फसवणूक व गैरव्यवहार होण्याचे प्रकार वाढले आहेत.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल नेटवर्कसाठी अनेक कंपन्या विविध सेवा देत आहेत. ग्राहकांना या सेवा वापरण्यासाठी सिमकार्ड खरेदी करणे आवश्यक आहे. काही ग्राहक त्यांच्या गरजेनुसार एकाच वेळी दोन किंवा अधिक सिमकार्ड वापरतात. या मागणीमुळे कंपन्यांनी ड्युअल सिम मोबाईल्स बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे एका मोबाईलमध्ये दोन वेगवेगळ्या सिमकार्डचा वापर करता येतो. पण कधीकधी त्या सिमकार्ड ची आवश्यकता नसल्यास आपण रिचार्ज करत नाही. आपण SIM Card बंद झाले असे समजतो पण कदाचीत्त त्या सीम कार्ड चा वापर गैरकृत्यात होऊ शकतो.
शासकीय योजनाची नियमित माहिती मिळवा
तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत कसे बघावे ?
जर तुमच्या ओळखपत्रावर सिमकार्ड नोंदणीकृत असेल आणि ते तुम्ही वापरत नसाल, तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला कायदेशीर अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुमच्या नावावर किती सिमकार्ड सक्रिय आहेत, हे तपासणे अत्यावश्यक आहे.
1) https://www.sancharsaathi.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या.
2) तुमचा मोबाईल क्रमांक आणि कॅप्चा भरा.
3) तुमच्या क्रमांकावर आलेला OTP भरून Validate वर क्लिक करा.
4) स्क्रीनवर तुमच्या ओळखपत्राशी संबंधित सर्व सक्रिय सिमकार्ड क्रमांकांची यादी दिसेल.
5) तुम्ही वापरत नसलेल्या क्रमांकांचे डिएक्टिवेशन करा.
Mahavitaran मार्फत कसे जिंकणार 3000+ Mobile आणि Smart Watch – Lucky Digital Grahak Yojana
दोनपेक्षा जास्त सिमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सूचना
1) तुमच्या आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक कायम सक्रिय ठेवा.
2) तो नंबर हरवल्यास शासकीय योजना किंवा इतर सुविधा मिळण्यात अडथळे येऊ शकतात.
3) OTP आधारित व्यवहारांसाठी तुमचा लिंक असलेला क्रमांक कार्यरत असणे आवश्यक आहे.
तंत्रज्ञानामुळे आपले जीवन सुलभ झाले आहे, त्यासोबतच सायबर फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. आपल्या नावावर किती सिमकार्ड सक्रिय आहेत, याची वेळोवेळी तपासणी करा आणि न वापरलेले क्रमांक बंद करा. सुरक्षित रहा आणि संभाव्य फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा.
आणखी योजना बघा – Click Here
Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. रोजगार मराठी हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.