रोजगार मराठी

ST Bus Live Location On Mobile : एसटी कुठे थांबली ? किती वाजता पोहचेल ? याची माहिती मिळवा, त्रास वाचवा.

ST Bus Live Location : ST म्हणजेच महाराष्ट्राची लाल परी. “एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी” हे ब्रीदवाक्य घेऊन अविरत महाराष्ट्राला सेवा पुरविणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांसाठी नियमितपणे विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतात. त्याचबरोबर वर्षानुवर्षे सेवेत असताना स्वतःच्या कार्यप्रणाली मध्ये पण नवीन युगाप्रमाणे, नवीन नवीन तंत्रज्ञाचा वापर करून बदल अंगीकारायचे प्रयत्न करिताअसते.

अशाच एका आणखी नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत तयार करण्यात आलेल्या एमएसआरटीसी अँप द्वारे घरबसल्या आपल्याला लाल परीचे Live Location कळणार आहे.

कुठेही प्रवासाकरिता निघताना बस स्टॉप वर येणाऱ्या प्रत्येक प्रवासाला आपली बस केव्हा येणार ? आपली बस चुकली तर नसेल ना ? बस येण्याला आणखी बराच उशीर लागणार आहे का ? असे अनेक प्रश्न नेहमीच पडत असतात.  परंतु आता प्रवाशांची हीच अडचण दूर होणार आहे, त्यांना हवी असलेली बस कुठे आहे ? किती वेळात बस स्थानकावर येणार आहे ? बस चा आपल्याला हव्या असलेल्या स्थानकावर येण्याकरिता किती वेळ लागणार आहे ? या सह अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एका App द्वारे मिळणार आहेत.

कोणती सुविधा मिळणार ?

MSRTC च्या माध्यमातून प्रवासांना मोबाईलवर एसटी बस ही कुठे थांबली आहे ? बस स्थानकावर किती वेळात पोहोचेल ? बस किती वाजता पोहोचेल ? याची ST Bus Live Location नुसार माहिती मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने प्रवासाच्या सोयी करता वेहिकल ट्रॅकिंग सिस्टीम व एमएसआरटीसी कॅम्मुटर (Vehicle Tracking System & MSRTC Computer) हे नवीन ॲप्लिकेशन तयार करण्यात आले असून त्याचा वापरही सुरू करण्यात आलेला आहे.

सध्या प्रवाश्यांना ST च्या App MSRTCN या App द्वारे Online Reservetion करता येते. पण या नवीन App द्वारे प्रवासांचा प्रवास सुकर व्हावा म्हणून रेल्वे प्रशासनाने जसे IRCTC सारखे विविध अँप विकसित केले आहेत त्याच धर्तीवर एसटी महामंडळाने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे जीपीएस GPC यंत्रणेचा वापर करून तयार केलेल्या App द्वारे बस ची Live माहिती प्रवासासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या या नवीन उपक्रमाचा प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे सध्याच्या परिस्थितीत बस कुठे आहे हे प्रवाशांना घरबसल्या कळणार असून त्यामध्ये तिकीट आरक्षण, लोकेशन ट्रेकिंग, बसचा मार्ग, महिलेचे सुरक्षितता, मार्गस्थ वाहना मधील बिघाड, वैद्यकीय अपघाती मदतीची सुविधा सुद्धा देण्यात आलेली आहे.

ST Bus Live Location करिता App कसे Download करावे ?

अँप डाउनलोड करण्यासाठी प्रवासांना प्ले स्टोअरवर जाऊन एमएसआरटीसी कॅम्मुटर (MSRTC Commuter) हे नाव टाकावे व  डाऊनलोड करावे लागणार आहे एप्लीकेशन ची लिंक खाली दिलेली आहेत त्या लिंकवरून तुम्ही अँप डाउनलोड करू शकता.

मराठी आणि इंग्रजी या भाषेमध्ये हे ॲप असल्याने वापरण्यास अतिशय सोपे आहे अभिप्राय व तक्रार नोंदवण्याचे सोयी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने यामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे ही अडचण सुद्धा दूर होणार आहे.

प्रवाशांची गैरसोयी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने MSRTC चे हे ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करून याचा उपयोग करावा याशिवाय एसटी महामंडळाच्या अन्य सुविधाचा लाभ घेऊन प्रवाशांनी बसमधून सुखकर प्रवास करावा अशी माहिती रणजीत राजपूत आगर प्रमुख जाफराबाद यांनी दिलेली आहे.

 

तक्रार असल्यास कशी करावी (ST Bus Live Location) ?

मोबाईल ॲप मध्ये तक्रारीसाठी विशेष कॉलम तयार करण्यात आलेला असून तक्रारीसाठी प्रवासी वाहक-चालक, बस स्थिती, बसची सेवा, ड्रायव्हिंग मोबाईल ॲप असं वर्गीकरण करण्यात आलेल्या त्यासाठी तक्रारदारास मोबाईल व वाहन किंवा एसटीचा क्रमांक नोंदवावा लागणार आहे.

अपघात झाल्यास या क्रमांकावर Call करा.

बसचा कुठे अपघात झाल्यास या सुविधेमुळे प्रवाशांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध होईल याशिवाय महिलांना बस मध्ये काही त्रास झाल्यास 100 किंवा 103 या क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

सर्वसामान्यासाठी अत्यंत उपयोगी हे अँप्लिकेशन आहे खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर (ST Bus Live Location) जाऊन तुम्ही हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून आतापासूनच वापरू शकतात व एसटी महामंडळाच्या विविध सुविधाचा लाभ घेऊ शकता.

 

एसटी महामंडळाचे App :

MSRTC Reservation App Download Now
MSRTC Computer App (Location) Download Now

इतर महत्वाच्या माहिती आणि योजनाची माहिती करिता क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top