रोजगार मराठी

बारावी नंतर पुढे काय ? What after 12th (HSC), शिक्षणाच्या संधी, विविध कोर्सेस सविस्तर माहिती.

HSC बारावी नंतर पुढे काय ?

सर्वप्रथम बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या संपूर्ण विद्याथ्यांचे अभिनंदन.

अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल कि बारावी नंतर पुढे काय ? एकतर याबाबत योग्य माहिती नसते किंवा शिक्षणाचे कोणते क्षेत्र निवडायचे याविषयी संभ्रमावस्था असते. अश्यावेळेस आम्ही आपल्याकरिता काही बेसिक माहिती घेवून आलेलो आहोत जी वाचून आपणास कदाचित निर्णय घेण्यास मदत होईल.

बारावी नंतर विद्यार्थी पारंपारिक कोर्सेस करू शकतो किंवा तांत्रिक कोर्सेस करू शकतो. विद्यार्थ्यांची आवड आणि क्षमता, शिक्षणाचे सद्या परिस्थितीत असलेले महत्व (Benefit After Complete Education in personal life for job security and for earning Money), पालकांची आर्थिक परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करून विद्यार्थाने आपले पुढील शिक्षणाचे क्षेत्र निवडायला हवे.

 

बारावी नंतर पदवी करिता उपलब्ध विविध शाखा

शिक्षण – बीएससी (B.Sc) Bachelor of Science
कालावधी – तीन वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी Science,

प्रवेश थेट संधी कोठे? – आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण – एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी.

 

शिक्षण – बीएससी (B.Sc, Agri) Bachelor of Science in Agriculture
कालावधी – 4 वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी Science व CET
संधी कोठे ? – कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण – एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन

 

शिक्षण – बीए (BA) Bachelor of Arts
कालावधी – तीन वर्षे
संधी कोठे ? – नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील शिक्षण – एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी

 

शिक्षण – बीकॉम (B. Com.) Bachelor of Commerce
कालावधी – तीन वर्षे
संधी कोठे ? – आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी

 

शिक्षण – बीएएलएलबी (BA LLB) Bachelor of Legislative Law
कालावधी – पाच वर्षे
संधी कोठे? – विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा
पुढील उच्च शिक्षण – एलएलएम

 

शिक्षण – डीएड (D.Ed.) Diploma in Education
कालावधी – दोन वर्षे
प्रवेश – सीईटी आवश्‍यक
संधी कोठे ? – प्राथमिक शिक्षण शिक्षक
पुढील उच्च शिक्षण – बीए, बीकॉम व नंतर बीएड

 

शिक्षण – बीबीए, (BBA) Bachelor of Business Administration.
कालावधी – तीन वर्षे
प्रवेश – सीईटी
संधी कोठे? – औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण – एमबीए, एमपीएम, एमसीए

 

शिक्षण – बीसीए (BCA) Bachelors’s in Computer Application
कालावधी – तीन वर्षे
प्रवेश – सीईटी
संधी कोठे? – औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण – एमबीए, एमपीएम, एमसीए

 

शिक्षण – बीबीएम (BBM) Bachelor of Business Management
कालावधी – तीन वर्षे
प्रवेश – सीईटी
संधी कोठे? – औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण – एमबीए, एमपीएम, एमसीए

 

फॉरेन लॅंग्वेज Foreign Language
(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज,
जॅपनीज, कोरियन)
कालावधी – बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर
कोर्सेसवर आधारित

तांत्रिक शिक्षण

ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्था मार्फत आपण खालील ट्रेड मध्ये शिक्षण घेवू शकता. वस्तातिक पाहता ITI करिता कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे. पण विद्यार्थी दहावी नंतर कधी पण ITI ला अर्ज करू शकतो.

महत्वाचे – जर विद्यार्थाने कोणत्याही ट्रेड मध्ये ITI पास केलेला असेल तर त्या विद्यार्थ्याला कॉलेजच्या मेरीट नुसार Engineering Diploma च्या द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो

०१) ट्रेड्स- DVET द्वारा कोण कोणत्या ट्रेड मध्ये आय. टी. आय. म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो, त्या संपूर्ण ट्रेड चे नाव खालील तालिकेत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

ट्रेड्स

Trade Name ट्रेड चे नाव
Wireman वायरमन (तारतंत्री)
Electrician इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)
Electronics Mechanic इलेक्ट्रोनिक मेकैनिक
Fitter फिटर
Information & Communication Technology System Maintenance ईनफॉरमेशन and कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनेंस
Interior Decoration and Designing इंटिरियर डेकोरेटर and डिजाईन
Machinist मशिनिस्ट
Machinist Grinder मेकैनिक ग्राइंडर
Mason (Building Constructor) मेसन (बिल्डींग कंन्स्ट्रक्शन)
Mechanic Diesel मेकैनिक डीझेल

 

Trade Name ट्रेड चे नाव
Mechanic Machine Tools Maintenance मेकैनिक मशीन टूल्स मेंटेनेंस 
Mechanic Medical Electronics मेकैनिक मेडिकल इलेक्ट्रोनिक्स
Mechanic Motor Vehicle मेकैनिक मोटर व्हेहिकल
Architectural Assistant आर्कीटेक्चरल असिस्टंट
Carpenter कारपेंटर
Computer Hardware & Network Maintenance कम्प्युटर हार्डवेयर and नेटवर्क मेंटेनेंस 
Computer Operator and Programming Assistant कम्प्युटर ऑपरेटर and प्रोग्रामींग असिस्टंट
Desktop Publishing Operator डेस्कटोप पब्लिशिंग ऑपरेटर
Draughtsman Civil ड्राफ्टसमन सिविल
Draughtsman Mechanical ड्राफ्टसमन मेकैनिकल

आय. टी. आय. शिकाऊ उमेदवार, प्रशिक्षण, नोकरी विषयी निरंतर माहिती करिता भेट द्या.  क्लिक करा

Trade Name ट्रेड चे नाव
SCVT – Steward एस. सी. वि. टी.
Mechanic Refrigeration & Air Conditioner मेकैनिक रेफ्रीजेरेटर and एअर कंडीशन
Painter General पेंटर जनरल
Plumber प्लंबर
Sheet Metal Worker शिट मेटल वर्कर
Surveyor सर्वेयर
Technician Power Electronic Systems टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रोनिक सिस्टम
Tool & Die Maker (Press Tools, Jigs & Fixtures) टूल and डाय मेकर (प्रेस टूल, जिग्स and फिक्स्चर्स)
Turner टर्नर
Welder वेल्डर

 

Trade Name ट्रेड चे नाव
Basic Cosmetology बेसिक कॉस्मेटोलॉजि
Dress Making ड्रेस मेकिंग
Front Office Assistant फ्रंट ऑफिस असिस्टंट
Fashion Technology फैशन टेक्नोलॉजि
Information & Communication Technology System Maintenance इन्फोर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजि  सिस्टम मैन्टेनेंस
Secretarial Practice (English) सेक्रेटरियल प्रेक्टिस
Fruit and Vegetable Processing फ्रुट & वेजीटेबल प्रोसेसिंग
Craftsman Food Production (General) क्राफ्ट्समन फूड प्रोडक्शन (जनरल)
Mechanic Tractor मेकैनिक ट्रेक्टर
Food and Beverage Guest Service Assistant फूड & बेवरेज गेस्ट सर्विस असिस्टंट

 

Trade Name ट्रेड चे नाव
Instrument Mechanic इन्स्ट्रुमेंट मेकैनिक
Machinist माशिनिस्ट
Machinist Grinder माशिनिस्ट ग्राइंडर
Mechanic Dies मेकैनिक डाइस
Mechanic Machine Tools Maintenance मेकैनिक मशीन टूल मेंटेनेंस
Mechanic Motor Vehicle मेकैनिक मोटार व्हेहिकल
Mechanic Refrigeration & Air Conditioner मेकैनिक रेफ्रीजेरेशन & एअर कंडीशनर
Technician Power Electronic Systems टेक्नीशियन पॉवर इलेक्ट्रोनिक्स सिस्टम
Turner टर्नर
Welder वेल्डर

 

Trade Name ट्रेड चे नाव
Sewing Technology सिविंग टेक्नोलॉजि
Craftsman Food Production (General) क्राफ्ट्समन फूड प्रोडक्शन (जनरल)
Pump Operator cum Mechanic पंप  कम मेकैनिक
Plastic Processing Operator प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर
Tool & Die Maker (Dies & Moulds) टूल & डाय मेकर (डाइस &  मोल्ड्स)
Attendant Operator Chemical Plant अटेंडट ऑपरेटर केमिकल प्लांट
Mechanic मेकैनिक Tractor

 

अभियांत्रिकी व ऑटो मोबाईल Engineering and Auto Mobile

शिक्षण – इंजिनिअरिंग डिप्लोमा Diploma in Engineering & Technology
कालावधी – तीन वर्षे
पात्रता व प्रवेश परीक्षा – बारावी Science, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश
संधी कोठे? – आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण – बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश

 

शिक्षण – बीई Bachelor of Engineering.
कालावधी – चार वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी Science , सीईटी
संधी कोठे? – स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण – एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस

 

शिक्षण – बीटेक Bachelor of Technology
कालावधी – चार वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी Science, आयआयटी जेईई, एआयईईई
संधी कोठे? – औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण – एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस

 

शिक्षण – ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी – Engineering Auto Mobile 
कालावधी – चार वर्षे
पात्रता – बारावी Science, सीईटी
शिक्षण – ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण
कालावधी – दोन वर्षे
पात्रता – बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण

 

कॉम्प्युटरमधील कोर्सेस Computer Courses

डीओईएसीसी “ओ’ लेव्हल
कालावधी – एक वर्ष ऊजएअउउ
डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी

 

Diploma in Advance Software Technology
कालावधी – दोन वर्षे
सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी
कालावधी – सहा महिने

 

सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन Certificate in Computer Application
कालावधी – तीन महिने

सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर Certificate in Computer

कालावधी – दहा महिने
इग्नू युनिव्हर्सिटी

सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग Certificate Course in Computer Programming
कालावधी – एक वर्ष

शिक्षण – बारावी

 

शास्त्र कॉम्प्युटर ऍप्लिकेशन Computer Application Science
कालावधी – एक वर्ष
वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट
कालावधी – दोन महिने

 

कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स Computer Operator and Programme Assistant
कालावधी – एक वर्ष
(फक्त मुलींसाठी)

 

डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग Diploma in Advertising And Graphic designing 
कालावधी – दोन वर्षे

 

गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट Game Designing and Development
कालावधी – एक वर्ष

 

प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग Print Imaging and Publishing,

कार्टून ऍनिमेशन Cartoon Animation,

ई-कॉम E-Com Development

 डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्‍स ऍण्ड ऍनिमेशन Web Graphics and Animation
कालावधी – एक वर्ष

 

कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट Computer Operator and
कालावधी – एक वर्ष

 

डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर Desktop Publishing Operator
कालावधी – एक वर्ष

 

रोजगाराभिमुख कोर्सेस

शिक्षण – डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी Diploma in Plastic Mould Technology
कालावधी – तीन वर्षे
पात्रता – बारावी (70 टक्के)
संधी कुठे मिळू शकेल – प्लॅस्टिक आणि मोल्ड इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी
उच्च शिक्षण – पदव्युत्तर शिक्षण
शिक्षण कुठे मिळेल – सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्‍स इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, म्हैसूर

 

शिक्षण – टूल ऍण्ड डाय मेकिंग Tool and Die Making
कालावधी – चार वर्षे
पात्रता – दहावी आणि बारावी पास
संधी – टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर
(जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग फाउंडेशन (एनटीटीएफ)

 

सेक्रेटरीअल प्रॅक्‍टिस
कालावधी – एक वर्ष
फॅशन टेक्‍नॉलॉजी
कालावधी – एक वर्ष
मॉडर्न ऑफिस प्रॅक्‍टिस
कालावधी – तीन वर्षे

 

हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम – टूरिस्ट गाइड
कालावधी – सहा महिने
डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस
कालावधी – दीड वर्ष

बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग
कालावधी – तीन महिने
बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन
सिस्टम (एअर टिकेटिंग)
कालावधी – एक महिना
अप्रेन्टाईसशिप
कालावधी – पाच महिने ते चार वर्षे

 

शिक्षण – व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी
डिजिटल फोटोग्राफी
कालावधी – एक वर्ष
स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग
कालावधी – एक ते तीन वर्षे
सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी
कालावधी – एक ते तीन वर्षे.

 

बांधकाम व्यवसाय शिक्षण – बीआर्च
कालावधी – पाच वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, NATA , JEE
संधी कोठे? – स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण – एमआर्च, एमटेक

 

वैद्यकीय क्षेत्र

शिक्षण – एमबीबीएस
कालावधी – पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र आणि NEETप्रवेश परीक्षा
संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

 

उच्च शिक्षण – एमडी, एमएस व इतर पदविका

शिक्षण – बीएएमएस
कालावधी – पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

 

पुढील उच्च शिक्षण – एमडी, एमएस व इतर पदविका

शिक्षण – बीएचएमएस
कालावधी – पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

 

पुढील उच्च शिक्षण – एमडी

शिक्षण – बीयूएमएस
कालावधी – पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी.

 

पुढील उच्च शिक्षण – पदव्युत्तर शिक्षण

शिक्षण – बीडीएस
कालावधी – चार वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

 

पुढील उच्च शिक्षण – एमडीएस

शिक्षण – बीएससी इन नर्सिंग
कालावधी – चार वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? – रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी .

 

पुढील उच्च शिक्षण – पदव्युत्तर शिक्षण

शिक्षण – बीव्हीएससी ऍण्ड एएच
कालावधी – पाच वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? – प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण – पदव्युत्तर शिक्षण

 

शिक्षण – डिफार्म

कालावधी – तीन वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, थेट प्रवेश
संधी कोठे? – औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय.

 

पुढील उच्च शिक्षण – बीफार्म

शिक्षण – बीफार्म
कालावधी – चार वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? – औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण – एमफार्म

संरक्षण दलांत प्रवेशासाठी

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात.
एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात.
वयोमर्यादा : साडेसोळा ते 19 वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

 

फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.
अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका. पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा.
विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी.
उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा.

अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्‍सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या.

अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा.

इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा.

काही महाविद्यालयांमध्ये प्रश्‍नावली भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण, करिक्‍युलर ऍक्‍टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्‍न असतात. अशा प्रश्‍नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा.
बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा.

 

मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

1) नीट आँनलाईन फाँर्म प्रिंट
2) नीटप्रवेश पत्र
3) नीट मार्क लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8 रहिवाशी प्रमाणपत्र
9) 12 वी टी सी
10) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
11) आधार कार्ड
12) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
13) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
14) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड

 

मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2021 पर्यत लागू)

 

इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

1) MHT-CET आँनलाईन फाँर्म प्रिंट
2) MHT-CET* पत्र
3) MHT-CET* मार्क लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8 ) रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी
10) आधार कार्ड
11) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
12) राष्ट्रीय बँकेतील खाते 13) फोटो.

मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे

1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र

 

काही महत्त्वाची संकेतस्थळे

1) तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन.
(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी)
www.dte.org.in

2) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी)
www.dmer.org

3) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी)
www.dvet.gov.in

4) पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ
www.unipune.ac.in

5) भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई
आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी)
www.iitb.ac.in

6) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) “एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण
www.aipmt.nic.in

7) एनडीए प्रवेश परीक्षेणसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगय (यूपीएससी)
www.upsc.gov.in

 

विशेष सूचना – सदर माहिती व्यतिरिक्त इतरही पर्याय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध राहू शकतात. तुमच्या शहरानुसार तफावत असू शकते. तरी विनंती करण्यात येते कि आपण सारासार आणि अद्यावत माहिती घेवून निर्णय घाय्वेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top