रोजगार मराठी

महाराष्ट्र राज्य विषयी माहिती ०१ मे महाराष्ट्र दिन विशेष

महाराष्ट्र राज्याविषयी संपूर्ण माहिती

 • महाराष्ट्र राज्यची स्थापना १ मे १९६०
 • राजधानी – मुंबई 
 • उपराजधानी – नागपूर
 • राज्यभाषा – मराठी
 • एकूण जिल्हे – ३६
 • एकूण तालुके – ३५५
 • एकूण ग्रामपंचायत – २८,८१३
 • एकूण पंचायत समित्या – ३५५
 • एकूण जिल्हापरिषद – ३४
 • एकूण विधानसभा आमदार – २८८
 • विधानपरिषद आमदार – ७८
 • महाराष्ट्र लोकसभा सदस्य – ४८
 • भारत देशामध्ये महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक – २ रा
 • भारत देशामध्ये महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या बाबतीत क्रमांक – ३ रा
 • भारत देशातील एकूण लोकसंख्येच्या ९.२९ % लोकसंख्या महाराष्ट्रातील आहे.
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त लोकसंख्या असलेला जिला – पुणे ( ९४.३ लाख )
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेला जिला – सिंधुदुर्ग ( ८.५० लाख )
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा  – गडचिरोली
 • महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगल असलेला जिल्हा – बीड
 • महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा – गोंदिया
 • महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठं जिल्हा – अहमदनगर
 • महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई शहर
 • महाराष्ट्रातील उंच शिखर – कळसुबाई १६४६ मी.
 • महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी – गोदावरी
 • महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारा असलेला जिल्हा – रत्नागिरी
 • जगातील सर्वात पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ असलेला जिल्हा – नागपूर
 • महाराष्ट्रातील संपूर्ण डिजिटल पहिला जिल्हा – नागपूर ( ऑक्टोबर २०१६)

जिल्हे निर्मिती

 • औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्हा वेगळा – दिनांक ०१ मे १९८१
 • उस्मानाबाद जील्ह्यातून लातूर जिल्हा वेगळा – दिनक १६ ऑगस्ट १९८२
 • चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्हा वेगळा – दिनांक २६ ऑगस्ट १९८२
 • बृहन्मुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर जिल्हा वेगळा – दिनांक  ०४ ऑक्टोंबर १९९०
 • अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्हा वेगळा – दिनांक ०१ जुलै १९९८
 • धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्हा वेगळा – दिनांक ०१ जुलै १९९८
 • परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्हा वेगळा – दिनांक ०१ मे १९९९
 • भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्हा वेगळा – ०१ मे १९९९
 • ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा वेगळा – ०१ ऑगस्ट २०१४

महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय विभाग – ०६

विभागाचे नाव जिल्हे क्षेत्रफळ
कोंकण मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ३०७४६ चौ. किमी.
पुणे / प. महाराष्ट्र पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर ५८२६८ चौ. किमी.
नाशिक / खान्देश नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार ५७२६८ चौ. किमी.
औरंगाबाद / मराठवाडा औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. ६४८११ चौ. किमी.
अमरावती / पश्चिम विदर्भ अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम ४६०९० चौ. किमी.
नागपूर / पूर्व विदर्भ नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया. ५१३३६ चौ. किमी.

 

महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा

 • वायव्येस – सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या,
 • उत्तरेस – सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
 • ईशान्येस – दरेकासा टेकड्या.
 • पूर्वेस – चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
 • दक्षिणेस – हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
 • पश्चिमेस – अरबी समुद्र.

राजकीय सीमा व सरहद्द –

 • वायव्येस – गुजरात व दादरा नगर हवेली
 • उत्तरेस – मध्यप्रदेश
 • पूर्वेस – छत्तीसगढ
 • आग्नेयेस – आंध्र प्रदेश
 • दक्षिणेस – कर्नाटक व गोवा

 

राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे

 • गुजरात – पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे
 • दादरा नगर हवेली – ठाणे, नाशिक  
 • मध्य प्रदेश – नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
 • छत्तीसगढ – गोंदिया, गडचिरोली
 • आंध्रप्रदेश – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड
 • गोवा – सिंधुदुर्ग

 

महाराष्ट्राची लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळ

 • लांबी – पूर्व – पश्चिम – ८०० कि. मी.
 • रुंदी – दक्षिण – उत्तर – ७२० किमी.
 • क्षेत्रफळ – ३,०७, ७१० चौ. किमी.
 • समुद्र किनारा – ७२० किमी.

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top